गोंदिया: गरबा हे लोकनृत्य आहे.नवरात्रीशी संबंधित आहे, या काळात रास गरबा आयोजित करणे ही एक जुनी परंपरा आहे. कधीकधी आपल्या साधारण स्वरूपात असलेला हा गरबा नृत्य आज फॅशनच्या काळात नवनवे स्वरूप घेऊन दिसून येतो, दररोज एक नवीन थीम आखली जाते आणि त्यानुसार महिला पोशाख धारण करतात त्यानुरूप कधी बंगाली साडी पोशाख तर कधी दक्षिणात्य तर कधी मराठमोळी नऊवारी साडी अशा प्रकारे गरबा खेळाचे बदलत असलेले स्वरूप अलीकडील काही वर्षापासून दिसून येत आहे  गोंदिया शहरामध्येही रास गरब्याचा उत्साह सुरू झाला आहे. आतापर्यंत तुम्ही दांडियाच्या साहाय्याने गरबा खेळताना पाहिले असेलच पण गोंदियामध्ये बजरंग दलाच्या दुर्गा वाहिनी सेनेद्वारे वर्षभर विविध वर्ग, कॅम्प, शिबिरे घेऊन महिलांना आत्मरक्षाचे धडे गिरविले जातात आणि याचेच थेट प्रदर्शन महिला आणि मुलीनी  सोमवार २९ सप्टेंबर रोजी चक्क लाकडी तलवारीने दांडिया खेळताना यातील विविध कौशल्य दाखविले. गोंदिया येथे गेल्या २१ वर्षांपासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी संघटना सुभाष गार्डन जवळील महिला समाज भवनाच्या मैदानावर जाती-पातींच्या वर जाऊन सामाजिक आणि धार्मिक श्रद्धेचा आदर करण्यासाठी गरबा आयोजित करण्यात आलेला आहे.

खरं तर, मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनीशी संबंधित बहिणी गेल्या कित्येक वर्षापासून आत्मरक्षाचे धडे गिरवत इतक्या बलवान झाल्या आहेत की त्या आता तलवारीने दांडिया वाजवून आपले शौर्य आणि धाडस दाखवत आहेत. एकंदरीत गरबा सुरक्षितता, आदर आणि स्वावलंबनाचा संदेश देतो.विहिंप जिल्हा उपाध्यक्षा वंदना पाठक आणि दुर्गा वाहिनीच्या विभाग समन्वयक रीता अरोरा म्हणाल्या – की गरबा हा केवळ नृत्य नाही तर देवीच्या पूजेचा उत्सव आहे, महिला शक्तीला सक्षम करण्याची प्रतिज्ञा देतो, त्यांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षित केले जाते, महिला त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी कधीही तलवार उचलू शकतात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा हा एक संघटने द्वारा केलेला प्रयत्न आहे.

या प्रसंगी पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या महिला धार्मिक गीतांच्या तालावर नाचतात आणि एका हाताने तलवार ३६० अंश फिरवून “छावा” चित्रपटाच्या पार्श्व संगीता वर स्त्रीशक्तीचे महत्त्व प्रस्थापित करताना त्यांना तलवारी द्वारे शिकविण्यात आलेले विविध डाव या माध्यमातून प्रदर्शन करतात. प्रेक्षकांनीही या अनोख्या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, संस्कृतीच्या रक्षक असण्यासोबतच महिला स्वतःच्या सुरक्षेच्याही रक्षक आहेत.

कपाळावर टिळक लावल्यानंतर, गरबा पाहण्यासाठी प्रवेश…..

सोमवारच्या गरबा कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या सविता विनोद अग्रवाल यांनी माता राणीच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून केले. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांच्या पत्नी सविता अग्रवाल यांनी महिला आणि मुलींसोबत मैदानात रास गरबा खेळून प्रोत्साहित केले. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांमध्ये  विहिंप ,बजरंग दलाचे अधिकारी मनोज मेंढे, सुधीर ब्राह्मणकर, सुनील गोहाडे आणि सुभाष पटले यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. व्यासपीठाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना कोरे यांनी केले. दुर्गा वाहिनीच्या समन्वयक मनीषा कटरे, सह-समन्वयक पलक सोनवणे आणि शहर समन्वयक आरती सराई गरबा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे नवरात्र पासून गरबा सुरू होण्यापूर्वी १५ दिवस आधीच तयारी केली जाते.

त्यांना प्रशिक्षण देण्यात आले, त्यानंतर त्यांना मोफत गरबा खेळण्यासाठी कार्ड वाटण्यात आले. माता आणि भगिनींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, गरबा सहभागींची ओळखपत्रे प्रवेशद्वारावर तपासली जात आहेत. बजरंग दलाचे कार्यकर्ते गरबा पंडालवर लक्ष ठेवून आहेत आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, प्रवेशद्वारावर सहभागींच्या कपाळावर टिळक लावला जात असल्याचेही या प्रसंगी दिसून आले.