वर्धा : राज्यातील विविध कामाची ८० हजार कोटी रुपयाची देयके थकीत असल्याचे सांगितल्या जात आहे. ही थकीत असतांनाच नव्या कामांना पण प्रारंभ होत आहे. थकीत रकमेमुळे मोठा व्याजदर देऊन घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा सवाल विदर्भ कंत्राटदार संघटनेने उपस्थित केला आहे. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना या बाबतीत विचारणा केल्यावर ते बोलून गेले की चिंता नको. तजवीज होत आहे. मात्र कंत्राटदार संघटना नेते किशोर मिटकरी म्हणतात की केवळ ५ टक्के निधी मिळाला. शासनाने तोंडाला पानेच पुसली.

विदर्भ कंत्राटदार संघटना व अन्य संबंधित संघटनानी मिळुन भिक मांगो आंदोलन करीत निषेध नोंदविला.संघटनेने शासनाकडे किमान ५० टक्के तरी थकीत रक्कम द्या, अशी मागणी केली होती. मात्र  फक्त ५ टक्के निधी देवुन  शासनाने कंत्राटदारांची फसवणूक केली.ही शोकांतिका  असल्याचे संघटना म्हणते.

शासनाने वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदाराची ६५०  कोटीची देयके प्रलंबित असताना वर्धा सा. बा. विभागाला फक्त १२  कोटींचा निधी देण्यात आला. प्रत्येक कंत्राटदाराला ५ टक्के प्रमाणे  निधी वाटप करण्यात आला.  आर्वी सा. बा. विभागालाही ७ कोटीचा निधी देण्यात आला. तेथीलही कंत्राटदाराना ४ ते ५ टक्के निधीचे वाटप करण्यात आले.

हा तुटपुंजा निधी देवुन कंत्राटदाराची घोर निराशा केली आहे.कंत्राटदाराला शासनाने ५० टक्के निधी देणे अपेक्षित होते. हा पाच टक्के निधी देवुन कोणत्या देणेदाराचे व मटेरियलचे पेमेंट करावे की बँकेचे व्याज द्यावे, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. कंत्राटदाराच्या घरी पैसे मागण्यासाठी सिमेट व अन्य मटेरियल विक्रेते व लेबर चकरा मारत आहे.अश्या परिस्थितीमधे लहान व मोठ्या कंत्रादारानी कसे जगावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विदर्भातील नागपूर येथील पी व्ही वर्मा या मोठ्या कंत्राटदाराने  ४० कोटीची देयके शासनाकडुन न मिळाल्यामुळे फाशी घेत आत्महत्या केली. हर्षल पाटील यांनी देयके न मिळाल्या मुळे फाशी लावुन आत्महत्या केली.

वर्धा येथील कंत्राटदाराने १५ ऑगस्ट रोजी सा. बां. विभागा समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला  होता.जिल्ह्यातील कंत्राटदाराना देयके न मिळाल्या मुळे जिल्ह्यातील हजारो मजुर बेरोजगार झाले आहे. सुपरवायझर, ड्राइव्हर, ईजिंनियर अडचणीत सापडले आहे. सर्व कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता,  मजुर संस्था देयके न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत  आले आहे.त्याचें कुटुंब रस्त्यावर आले आहे.विकासाची चालु असलेली सर्व कामे बंद करीत आदोंलन करू,  असा निर्धार सघंटनेने व्यक्त केला आहे.

गणपती बाप्पा चे विसर्जन झाल्यानंतर हे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला.

संघटना सभेत दोन दिवंगत कंत्राटदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेत अध्यक्ष किशोर मिटकरी तसेच अजय घवघवे, प्रमोद चव्हाण, संदीप डेहने,  अरविंद कोकाटे, निक्की चव्हाण,  विशाल शेडें,  विशाल वाट, अशोक चंदनखेडे, बाळु शिदे, हर्षल मँडमवार,  रणजित मोडक, राजेश हाडोळे,  संजय नांदनवार, पिंटू सातपुते, सुनिल शेरजे, अजय पाल,  यादव महाराज,  रमेश भगत, सारंग  चौरे, युवराज शिदें, राजु निखाते, प्रशांत धोटे, अवधूत मोने, मंगेश जगताप,  वैभव कळबे, सागर मुंदडा,  गोविंदा आस्कर, विशाल व्यास, पारस माळोदे, स्वप्नील कामडी अमर राठोड, सुनिल बासु, रमेश घडीया यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.