नागपुरात फडणवीसांचं जंगी स्वागत; कार्यकर्त्यांची गर्दी पाहून भारावले; म्हणाले “आज याच प्रेमामुळे…”

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पोहोचले असता त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं

Devendra Fadanvis recieves grand welcome in Nagpur
देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं (एक्स्प्रेस फोटो – धनंजय खेडकर)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपद आलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले. पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. फडणवीसांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा देवमाणूस असा उल्लेख करण्यात आला आहे. फडणवीसांनी यावेळी याच प्रेमामुळे आपण यशस्वी आहोत अशी भावनाही व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर विमानतळावर सकाळी ११.३० वाजता आगमन झालं. यावेळी ढोल ताशाच्या निनादात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विमानतळावर स्वागत केल्यानंतर मिरवणुकीचे हॉटेल प्राइड चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाकांची आतिषबाजी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते स्कूटर मिरवणूक काढत सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनाचे फलक लागले आहेत. यावर त्यांचा देवमाणूस असा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी जाहीर सभा होणार आहे.

पाहा व्हिडीओ –

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला, शासन सतर्क

विमानतळाबाहेर फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “नागपूरकरांना आमच्यावर नेहमीच प्रेम केलं आहे. आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक जमले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आज मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पडण्याचा संकल्प आहे”

“सुप्रीम कोर्टात आम्ही योग्य ती बाजू मांडू. आम्ही योग्य काम केलं असल्याने योग्य निकाल येईल. पण आता न्यायालयावर टिप्पणी करणं अयोग्य ठरेल,” असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करु असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp devendra fadanvis recieves grand welcome in nagpur sgy

Next Story
दोनशे महाविद्यालयांवर कारवाईची टांगती तलवार; काही भाड्याच्या इमारतीत, काही दोन खोल्यांमध्ये
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी