नागपूर : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात पहिल्यांदाच काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक वाइल्ड डॉग) नोंद करण्यात आली. कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील यांना हा काळा रानकुत्रा दिसून आला. याचे महत्व ओळखून पाटील यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना माहिती दिली.
वनविभागाच्या नोंदी नुसार १९३६ मध्ये तमिळनाडूतील कोइम्बतूर वन विभागातील गड्डेसल येथे शिकारी, निसर्गशास्त्रज्ञ, कॉफी प्लांटर आणि स्कॉट्समन आर.सी. मॉरिस यांनी एका काळ्या रानकुत्र्याची नोंद केली होती. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आढळलेला हा रानकुत्रा संपूर्ण काळा होता.
रानकुत्र्याची माहिती…
हा रंगाने तांबूस लालसर असतो. रानकुत्र्याचे कान टोकाकडे गोलाकार असतात. हनुवटी खालचा भाग पंधराट असतो. रानकुत्र्याच्या शेपटीचा टोकाकडील बहुतांश भाग हा काळसर असतो. रानकुत्र्याची उंची ४३ ते ४५ सेंटीमीटरपर्यंत असते तर शरीराची लांबी ३ फुटापर्यंत असते. नराचे वजन २० किलोच्या आसपास असून मादीचे वजन नरापेक्षा कमी असते. कळपाने राहणाऱ्या या प्राण्याच्या वास्तव्य जंगला मध्ये दिसून येते. रानकुत्रा कळपाने शिकार करतात. त्यामुळे त्यांना मोठ्या व ताकदवर प्राण्याची शिकार करण्यास मदत होते. हरीण वर्गातील प्राणी हे त्यांचे आवडीचे खाद्य आहे. कळपातील प्राण्यांचीसंख्या जास्त असल्यास ते गवया सारख्या मोठ्या प्रण्याचीसुधा शिकार करतात. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान पिल्ल बघायास मिळतात.मादी एका वेळी ४ ते ६ पिलांना जन्म देते.
अधिकारी म्हणतात…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांना याबाबत माहिती देण्यात आली. सदर परिसरात कॅमेरा लावून अधिक माहिती व अभ्यास करण्याच्या सूचना वनरक्षकांना देण्यात आल्या आहेत.
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात पहिल्यांदाच काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक वाइल्ड डॉग) नोंद करण्यात आली. कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील यांना हा काळा रानकुत्रा दिसून आला.
— LoksattaLive (@LoksattaLive) June 24, 2025
व्हिडीओ सौजन्य: पर्यटक दिग्विजय पाटील#RAREBLACKWILDDOG #WildDog pic.twitter.com/Zwkyev6j7Q
रोहन भाटे म्हणतात…
जीवशास्त्रात मेलेनिस्टिक म्हणजे अशी स्थिती जिथे एखाद्या प्राण्यामध्ये मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्यपणे जास्त प्रमाण असते, ज्यामुळे त्याचा रंग नेहमीपेक्षा जास्त गडद होतो, बहुतेकदा काळा. सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यासह विविध प्रजातींमध्ये हे अनुवांशिक फरक दिसून येतो, जिथे ते काळे फर, पंख किंवा त्वचेच्या स्वरूपात प्रकट होऊ शकते. ह्या पूर्वी काळा बिबट्या सह्याद्री मध्ये नोंद झाला आहे.