नागपूर : रेल्वेने दिवाळी आणि छट पूजेसाठी आपल्या मूळ शहरात, गावाकडे जाणाऱ्यांसाठी ९६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असते. नियमित गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन दिवाळी आणि छट या सणांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर, त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल साप्ताहिक विशेष, लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची साप्ताहिक विशेष आदी मार्गावर ९६ विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर विशेष गाडी २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दररोज १०.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल.

हे ही वाचा…Video : चंद्रपूर शहरात बिबट्याचा धुमाकूळ

दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशेष गाडी २३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत दानापूर येथून दररोज रात्री साडे नऊ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल साप्ताहिक विशेष २१ ऑक्टोंबर ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि आसनसोल येथे तिसऱ्या दिवशी अडीच वाजता पोहोचेल.

हे ही वाचा… लोकजागर: चुकलेले ‘ठाकरे’!

आसनसोल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २३ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दर बुधवारी आसनसोल येथून रात्री नऊ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता येथे पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर साप्ताहिक विशेष गाडी २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज रात्री १०.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.

गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर पर्यंत दररोज गोरखपूर येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता पोहोचेल.

हे ही वाचा… गडचिरोली : चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट…

लोकमान्य टिळक टर्मिनस- संत्रागाची साप्ताहिक विशेष गाडी २९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि संत्रागाची येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल.

हे ही वाचा… यवतमाळ जिल्ह्यातील जलवाहिनी घोटाळाः उच्च न्यायालयाकडून चौकशीचे संकेत…

संत्रागाची- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी संत्रागाची येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railways decided to run 96 special trains from mumbai during diwali and chhat puja rbt 74 sud 02