चंद्रपूर: मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाचे क्रीडांगण येथे एका झाडावर सकाळच्या सुमारास बिबट्या बसून असल्याचे निदर्शनास आले. लोकांची गर्दी होताच हालचालीनंतर बिबट्या जंगलात निघून गेला.
चंद्रपूर – गडचिरोली मार्गावर ताडोबा बफर झोनच्या जंगलाला लागून मूल शहर वसलेले आहे. मूल शहर येथून गोंदिया येथे जाणारी रेल्वे लाइन आहे. याच रेल्वे लाईन लगत मुल शहरातील सर्वात मोठे कर्मवीर महाविद्यालय आहे.
आज जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र योग दिनाचे कार्यक्रम सुरू असताना या महाविद्यालयातील एका झाडावर बिबट्या लोकांना दिसला. हा बिबट्या झाडावर विश्रांती करीत होता.
चंद्रपूर: मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाचे क्रीडांगण येथे एका झाडावर सकाळच्या सुमारास बिबट्या बसून असल्याचे निदर्शनास आले. लोकांची गर्दी होताच हालचालीनंतर बिबट्या जंगलात निघून गेला. (video credit – social media, chandrapur) pic.twitter.com/RKeoPKjwUe
— chaitanya sudame (@ChaitanyaSudame) June 21, 2025
लोकांच्या दृष्टीला बिबट्या दिसताच एकच गर्दी झाली. त्यानंतर जो तो बिबट्याला बघण्यासाठी तिथे थांबत होता. बराच वेळ बिबट्या झाडावर होता. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाने घटनास्थळी येऊन बघितले. दरम्यान बिबट्या काही वेळातच लोकांची नजर चुकवून जंगलात निघून गेला.