लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियासदृश आजाराने थैमान घातले आहे. चिकनगुनियाग्रस्त रुग्णांची संख्या शतकाकडे तर डेंग्यूग्रस्तांची संख्या अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याविषयी तत्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शहरातील दहा झोनमध्ये १ जानेवारी ते ३० जुलै २०२४ पर्यंतच्या काळात डेंग्यूचे एकूण ४४ रुग्ण आढळले. त्यापैकी ८० टक्क्यांहून जास्त रुग्ण मागील दोन महिन्यात आढळले. तर शहरातील दहाही झोनमध्ये १ जानेवारी ते ३० जुलै २०२४ दरम्यानच्या काळात चिकनगुनियाचे एकूण ९३ रुग्ण आढळले. त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे मागील दोन महिन्याच्या काळातील आहे. हल्ली शहरातील सगळ्याच भागात डेंग्यू आणि चिकनगुनियाची लक्षणे असलेले रुग्ण आढळत आहेत. परंतु, तपासणीत मात्र कमी रुग्णांमध्ये या आजारांचे निदान होत आहे. या प्रश्नावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क केला असता चिकनगुनिया हा आजार जास्त काळ राहत नाही. त्यामुळे रुग्णाचा ‘व्हायरल लोड’ कमी झाल्यावर तपासणीत रुग्णांना आजार असल्याचे कळणे कठीण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरात या आजाराचे रुग्ण कमी नोंदवले जाण्याची शक्यताही या क्षेत्रातील तज्ज्ञ नाव न टाकण्याच्या अटीवर सांगत आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : पोलीस खबरी असल्याचा संशय; नक्षल्यांकडून आदिवासी नागरिकाची हत्या…

सध्या शहरातील सगळ्याच भागात डास वाढते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाची भीती वाढल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क केला असता त्यांनी या रुग्णसंख्येला दुजोरा दिला. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सर्वत्र कीटकनाशक फवारणी, जनजागृती, सर्वेक्षणासह रुग्ण आढळताच त्यांच्यावर उपचार केला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाल्याचा महापालिकेचा दावा आहे.

खासगी रुग्णालयात डेंग्यूचा एक मृत्यू ?

वरिष्ठ पत्रकार तथा उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजणे (४८) यांचे मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नागपुरातील कस्तूरचंद पार्क मैदान जवळच्या खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात डेंग्यूचे निदान झाले होते. उपचारादरम्यान तीन दिवसापूर्वी ते स्वच्छतागृहात पडल्याने त्यांच्या डोक्याला छुपा मारही लागला होता. आता त्यांचा मृत्यूचे कारण आरोग्य विभाग डेंग्यू की इतर नोंदवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-यवतमाळ : शकुंतलेचं काय होणार? मुद्दा राज्यसभेत…

शाळांमध्ये डास प्रतिबंधासाठी कोणते उपाय?

डासांपासून वाचण्यासाठी पालक घरात प्रतिबंधात्मक उपाय करतात. परंतु शाळेत डास प्रतिबंधाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेतही डास प्रतिबंधासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत रामनगर परिसरातील रहिवासी राजेश लोणारे यांनी व्यक्त केले.

शहरातील रुग्णांची स्थिती (१ जानेवारी ते ३० जुलै २०२४)

झोनडेंग्यूचिकनगुनिया
लक्ष्मीनगर०७००
धरमपेठ०५३४
हनुमाननगर०३००
धंतोली०४००
नेहरूनगर०२०१
गांधीबाग०२००
सतरंजीपुरा०३००
लकडगंज०६००
आशीनगर०६०३
मंगळवारी०६५५
एकूण४४९३
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chikungunya and dengue outbreaks in nagpur struggling for sanitation rating mnb 82 mrj