शौचालयात चप्पल घालून जाण्यावरून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांच्या गटात हाणामारी झाली. या प्रकरणी दोन कैद्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.जिल्हा कारागृहात मंगळवारी शुल्लक कारणावरून कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका कैद्याच्या डोळ्याला दुखापत झाली तर अन्य एका कैद्याला मार लागल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या…महाराष्ट्र एक्सप्रेस व गरीबरथ एक्सप्रेस पुन्हा रद्द

हाणामारीची ही घटना वेळीच कारागृहातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच दोन्ही गटाला शांत करण्यात आले. ही हाणामारी नेमकी कशावरून झाली यासंदर्भात अधिकची माहिती मिळू शकली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कैद्यावर उपचार केल्यानंतर दुखापत बरी झाल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कारागृहात संपर्क साधला असता कारागृह अधिक्षक नागपूर येथे गेल्याचे सांगण्यात आले. हाणामारीबद्दल विचारणा केली असता काहीही सांगण्यास नकार दिला.चपल घातल्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash between two groups of prisoners in chandrapur district jail rsj 74 amy