नागपूर : उपराजधानीत आता करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. २४ तासांत शहरात नवीन ६ रुग्ण आढळल्याने नागपूर जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या आता १३ रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान, सुमारे ६ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल असल्याचे पुढे आल्याने आरोग्य विभागाला पुन्हा धडकी भरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील शहरी भागातील सर्वाधिक सक्रिय करोनाग्रस्त धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमाननगर या तीन झोनमध्ये आहे. या तिन्ही झोनमध्ये सध्या प्रत्येकी ३ रुग्ण आहेत. तर धंतोली आणि नेहरूनगर झोनमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर नागपूर ग्रामीणलाही दोन रुग्ण आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ६ रुग्ण सध्या शहरातील विविध रुग्णालयांत दाखल आहे. त्यापैकी एकही रुग्ण गंभीर नसल्याची माहिती नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, नागपुरात गेल्या अनेक दिवसांपासून जनुकीय तपासणीसाठी निरीच्या प्रयोगशाळेत गेलेल्या ९ नमुन्यांचा अहवाल पुढे येत नसल्याने ही तपासणी खोळंबली कुठे? हा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहे.

हेही वाचा – “तरुणांच्या हाती काम नाही त्यामुळे त्यांचे दिवसातले सात ते आठ तास फेसबुक-इंस्टाग्रामवर…”, राहुल गांधींची टीका

हेही वाचा – वीज बिल नेमके कमी कसे करावे? जाणून घ्या हा पर्याय…

सक्रिय रुग्णांचे वय

नागपुरात गुरुवारी सक्रिय करोनाग्रस्तांमध्ये ७८ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, २० वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरुष, ६६ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिलेचा समावेश होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona patients increased in nagpur 6 people in hospital see how many active patients mnb 82 ssb