RSS Centenary Celebration: नागपूर: दलाई लामा हे तिबेटी बौद्धांचे सर्वोच्च धार्मिक गुरू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त त्यांनी आपला विशेष संदेश पाठवलेला आहे. या संदेशामध्ये त्यांनी संघाचे भरभरून कौतुक केले. भारतातील प्राचीन संस्कृती टिकवण्यासाठी मूल्याधिष्ठित समाज निर्मितीत संघाचे सर्वात मोठे योगदान असल्याचे दलाई लामा म्हणाले.

दलाई लामांचा संदेश काय

संघात प्रवेश घेणारा प्रत्येक व्यक्ती हा कर्तव्यदक्ष आणि समर्पणाने काम करतो. संघाच्या १०० वर्षाच्या प्रवास हा समर्पण आणि सेवेचा अतुलनीय विश्वास आहे. संघाने नेहमी प्रत्येकाला जोडून भौतिक आणि अध्यात्मिक रूपाने सशक्त करण्याचा काम केले. भारताच्या दुर्गम भागात जाऊन शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचे काम संघाने केले. विविध भागात आलेल्या पूर परिस्थिती आणि अपघातात मदत करणाऱ्यांमध्ये संघ कायम अग्रेसर असतो.

मागील पन्नास वर्षाच्या काळात संघ आणि त्यांच्या विविध संस्थांना जोडून अनुभवण्याची मला संधी मिळाली. व्यक्तिगत जीवनात एकूण मनुष्य म्हणून मानव मूल्यांची संवर्धन करणे आणि धार्मिक गुरु म्हणून सर्व धर्म समभावाचे, विचारांचे जपन करणे आणि प्राचीन भारतीय विद्यांचे संरक्षण करणे हे मी माझे मूळ कार्य मानतो. हे सर्व कार्य संघ करत आला आहे. त्यामुळे संघाविषयी मला विशेष प्रेम आहे.भारतात असलेल्या तिब्बती जनतेच्या संरक्षणाचे काम संघाने कायम केलेले आहे.