नागपूर : मानकापूर उड्डाणपूलावर नुकताच शालेय बसचा अपघात झाल्यानंतर, आता सदर येथील मंगळवारी उड्डाण पुलावर धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात सळ्या बाहेर आल्या आहेत आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असलेल्या नागपुरात मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल भुयारी मार्गाचे काम सुरू आहे परंतु गुणवत्ता आणि त्यांची देखभाल दुरुस्ती कडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला व इंदोरा चौक ते आरबीआय चौकाला जोडणारा मंगळवारी उड्डाणपूल सध्य अत्यंत वाईट स्थितीत आहे. या फुलाच्या सळ्या (लोखंडी रॉड) बाहेर आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वा गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
काटोल जुना नाका आणि मानकापूरकडून येणारा उड्डाणपूल आरबीआय जवळ उतरतो, त्यामुळे संविधान चौकाकडून इंदोरा किंवा कामठीकडे जाण्यासाठी सदर मधील मंगळवारी उड्डाण पुलावरून जावे लागते. हा पूल म्हणजे मध्य नागपूर (मोतीबाग), पश्चिम नागपूर (सदर, राज नगर, भानकापूर)आणि उत्तर नागपूर (इंदोरा टेका नाका) यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे.
या पाश्र्वभूमीपर मंगळवारी उडाणपुलाबचत जागरिकांनी, स्थानिक प्रतिनिधींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी आजाकत केली आहे. या उणपुरा मध्या भागातील सळया निघाल्या आहेत, लेवे खा पडला आहे. वाहनचालक हा खा टाळयासाठी बाजूने वाहन कावतात पुलाची सध्या जी स्थिती आहे, ती पहता, कोगलीही मोठी दुर्घटना होण्याआधी तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू करणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मामात्र डागडुजी करते आणि काही दिवसांत पुन्हा डांबर निघून सध्या बाहेर वेताल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
जड वाहनांना तर मंगळवारी उड्डाणपूल शिवाय पर्यायच नाही. कारण, गड्डी गोदाम रेल्वे भुयारी मार्गाची उंची फारच कमी आहे.त्यामुळे मंगळवारी उड्डाणपुलावरील वाहतूक वळवली आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून या उड्डाण पुलावर खड्डे, सळ्या उघड्या पडणे आणि काँक्रीट उखडून रस्त्यावर पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु काहीच झाले नाही. पुलावरून रोज त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
अलीकडेच मानकापूर रेल्वे उड्डाणपुलावर असाच सळ्या बाहेर आल्या होत्या, त्यानंतर तेथे देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू झाले. हे काम राष्ट्रीय महामार्ग करत होते तरीदेखील कामात दिरंगाई झाली व स्कूलबसचा अपघातात या अपघातात एका विद्यार्थिनीचा आणि बसचालकाचा मृत्यू झाला होता.