नागपूर : सर्व देशात चकचकीतपणासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर मेट्रोच्या डब्ब्यांचे विद्रुपीकरण करण्याची घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज पाहून अज्ञाताचा शोध घेतला जात आहे.

नागपुरात खापरी स्थानकाजवळ मेट्रोचा डेपो आहे. तेथे गाड्या देखभाल दुरुस्तीसाठी पाठवल्या जातात. स्थानक आणि डेपोच्या मध्ये एक गाडी उभी असताना एका अज्ञात इसमाने डब्बे आणि इंजिनवर स्प्रेच्या माध्यमातून रंग लावून डब्बे व इंजिनचे विद्रुपीकरण केले. विशेष म्हणजे सुरक्षा व्यवस्था चोख असताना अशी घटना घडली कशी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा – “गुन्हेगारीवर नियंत्रण अन् शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही उत्तम!” काय आहे वाशीम पोलिसांचा अभिनव उपक्रम, जाणून घ्या…

हेही वाचा – सावधान! चंद्रपूर-गडचिरोलीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय, दोघांना अटक

बुधवारी ही बाब उघडकीस आली. या संदर्भात महामेट्रोकडे विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.