वाशीम : जिल्ह्यातील पोलीस व जनतेत सलोखा वृद्धिंगत करून घटना घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ सुदृढ व्हावे, याहेतूने  वाशीम पोलिसांनी ‘सायकल पेट्रोलिंग’ चा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

हेही वाचा >>> नागपूर : जिवंत असताना देशसेवा केली, जग सोडतानाही आले समाजाच्या कामी

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील अरुंद रस्ते व गल्लीबोळातून सायकलद्वारे पेट्रोलिंग करणे सहज शक्य होणार असून गुन्हे नियंत्रण व प्रतिबंध करण्यास मदत होण्याची आशा पोलीस विभागाला आहे. सायकल पेट्रोलिंगच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व अंमलदारांना कर्तव्याबरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थाची सांगड घातली आहे. ‘सायकल पेट्रोलिंग’ करिता ६ तालुक्यातील पोलीस स्टेशन स्तरावर ३ तर इतर ७ पोलीस स्टेशन स्तरावर २ अशा एकूण ३२ सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.