नागपूर : महाविकास आघाडीतील घटक पक्षांची प्रथम आपला पक्ष एकसंघ ठेवावा आणि त्यानंतरच एकत्र विविध मोट बांधावी अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – अकोल्यात जुळवाजुळवीवर सर्वच राजकीय पक्षांचा भर

हेही वाचा – अकोला: खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात विनापरवाना कॅफे; कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकणार

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठकी यापूर्वी झाल्या असून त्यातून काहीच निष्पन्न निघत नाही. महाविकास आघाडीमधील काही वरिष्ठ नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात एकत्र येण्यापेक्षा स्वत:चे पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे फडणवीस म्हणाले. न्या. रोहित देव यांच्या राजीनाम्यावर मात्र फडणवीस यांनी न्यायालयीन बाब असल्याचे सांगत बोलणे टाळले.