चंद्रपूर : कमी दरात रेती का टाकतोस, अशी विचारणा करणाऱ्या कंत्राटदार जितू चावला यास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांनी वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे रविवारी सायंकाळी धक्काबुक्की करून मारहाण केली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तिघांना अटक करून चारचाकी वाहन जप्त केले. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चावला हे रेतीचा व्यवसाय करतात. त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांची वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे भेट घेत, ‘तुम्ही कमी दरात रेती का टाकता,’ असा प्रश्न केला. यावरून चौघांमध्ये वाद झाला. गिऱ्हे, ठाकूर, बेले या तिघांनी चावला यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. चावला यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. न्यायालयाने तिघांचीही जामिनावर सुटका केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District head of thackeray group arrested and bailed in case of assault on sand contractor rsj 74 amy