गोंदिया : पावसाचा ‘रेड अलर्ट’ ; भंडाऱ्यात उद्या शाळांना सुटी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

गोंदिया : पावसाचा ‘रेड अलर्ट’ ; भंडाऱ्यात उद्या शाळांना सुटी
( संग्रहित छायचित्र )

भारतीय हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ घोषित केल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग उद्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी उद्या (बुधवार १०ऑगस्ट) सुटी जाहीर केली आहे. या आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अमरावती : मंत्रिपद आमचा हक्‍क, तो मिळवणारच : बच्‍चू कडू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी