लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे.

२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील. ३ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून करण्यात येईल व छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येण्यात येईल. नामनिर्देशनपत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर आहे. अपील नसलेल्या ठिकाणी ११ डिसेंबर रोजी, तर अपील असलेल्या ठिकाणी १३ डिसेंबर रोजी दु. ३ वा. पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.

आणखी वाचा-चंद्रपुरातील पुरातन मंदिर, किल्ल्यांचे रुपडे पालटणार; ५८ कोटींचा निधी प्रस्तावित

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निशाणी वाटप अपील नसलेल्या ठिकाणी ११ डिसेंबर व अपील असलेल्या ठिकाणी १३ डिसेंबर रोजी दु. ३.३० नंतर होईल. मतदान केंद्राची यादी १३ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. मतदान १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान आणि मतमोजणी १८ डिसेंबरला सकाळी १० वा. पासून होईल. निवडून आलेल्या सदस्यांचे नाव २१ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत सदर क्षेत्रात आचारसंहिता अंमलात राहणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election battle in akola district code of conduct applies ppd 88 mrj