नागपूर : जिल्ह्यातील धामना गावाजळ स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन दगावलेल्यांची संख्या आता सहा झाली आहे. आठ ते दहा कामगार जखमी झाले असून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगावलेल्यामध्ये चार महिला व एक पुरुष कामगारांचा समावेश आहे. स्फोटामध्ये पाच कामगार दगावले होते. त्यात प्रांजली मोदरे , प्राची फालके, वैशाली क्षीसागर, मोनाली अलोणे, पन्नालाल बंदेवार यांचा समावेश आहे. रुण्णालयात उपचारा दरम्यान शीतल चटप या महिला कामगाराचा मृत्यू झाला.

नागपूर जवळील धामना येथे स्फोटकं तयार करणारी चामुंडा कंपनी आहे. सकाळी दहा वाजता कंपनी सुरू झाल्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. यावेळी कंपनीत १० ते १२ कामगार कामावर असताना त्यात ६ कामगारांचा कंपनीत मृत्यू झाला तर सात ते आठ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. दगावलेले कामगार वाडी आणि धामना परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आक्रोश सुरू केला. घटनेनंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी जखमी कामगारांना तात्काळ रविनंगरातील सेनगुप्ता रुग्णालयात हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे. रुग्णालयात कामगारांच्या नातावाईकांची गर्दी झाली होती. दरम्यान कंपनीत स्फोट झाल्यामुळे धामना परिसर हादरुन गेला. आजूबाजूच्या कंपनीतील कामगार घटनास्थळी आले. राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर घटनेची माहिती घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांशी व कंपनीच्या मालकांशी चर्चा केली.

हेही वाचा – सातशे वारकरी, ५५ वर्षांची परंपरा; ‘श्रीं’च्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

घटनासथळी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून दगावलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आल्यानंतर घटनास्थळी लोकांचा आक्रोश बघायला मिळाला. दरम्यान जखमी झालेल्यांमध्ये तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली. अग्निशमन विभागाच्या गाडी घटनास्थळी पोहोचल्या. पाच कामगार घटनेत दगावले असल्याची माहिती समोर आली असून अजून काही कामगार कंपनीत अडकले आहे का याचा शोध घेत आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीची मागणी परिसरातील कामगारांनी केली.

हेही वाचा – “लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांना सुपारी देण्याचा प्रयत्न,” प्रतिभा धानोरकर यांचा आरोप

दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील बाजारगावातील एका सोलर एक्सप्लोरी कंपनीत स्फोट होऊन त्या स्फोटामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर तीन जणांना वाचवण्यात यश आले होते. ही कंपनी संरक्षण क्षेत्राला लागणारा दारुगोळा निर्मितीचे काम करत होती. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लॅन्टमध्ये पॅकिंगचे काम सुरु होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. या कंपनीत संरक्षण क्षेत्राशी संबंधित दारूगोळा निर्मितीचे काम सुरु होते. त्यात मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. या केमिकलमुळे हा स्फोट झाला होता आणि त्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला होता.