चुलत भावाला वाचविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या शेतकऱ्याला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. लोणार तालुक्यातील भूमराळा दरी येथे ही दुर्देवी घटना घडली. प्रकरणी पोलिसांनी जालना जिल्ह्यातील तीन रहिवासीयांसह पाच आरोपींना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर: उपराजाधानीत स्टेरॉईड, बनावट प्रोटीनची विक्री!

भुमराळा येथील गणेश चिंतामण चव्हाण यांनी शेवली ( तालुका मंठा जिल्हा जालना) येथील एका मुलीच्या मोबाईलवर संदेश पाठविला. यामुळे संतप्त झालेले मुलीचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी भुमराळा येथे दाखल झाले. यावेळी झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. हे भांडणे सोडवण्यासाठी भानुदास रोहीदास चव्हाण (५०) हे गेले. यावेळी अशोक कहाळे, सिमा नितीन कहाळे (राहणार रुम्हणा, तालुका सिंदखेड राजा), दिलीप यशवंत कहाळे, मंगल दिलीप कहाळे ( राहणार शेवली जिल्हा जालना) यांनी त्यांना गंभीर मारहाण केली. यात भानुदास यांचा मुत्यू झाला.

हेही वाचा >>>नागपूर: ‘एच ३ एन २’चा आणखी एक रुग्ण आढळला

मृतकची पत्नी प्रयागबाई भानुदास चव्हाण यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीसांनी अशोक कहाळे, सिमा नितीन कहाळे, दिलीप यशवंत कहाळे, मंगल दिलीप कहाळे या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सदानंद सोनकांबळे, अरुण सानप हे करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer death due to brutal beating buldhana scm 61 amy