लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: मुलगा बापाचा आदर करतो आणि पित्यानेही सन्मानजनक वागणूक देण्याची अपेक्षा ठेवतो. पण या घटनेत जरा विचित्रच घडले.

सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथील अक्षय पुंडलिक बावणे या गवंडी काम करणाऱ्या युवकाने वडिलांच्या नावे होंडा शाईन ही दुचाकी विकत घेतली होती. कर्जाचे हफ्ते तोच भरायचा. गाडी बापलेक दोघेही चालवायचे. दोन दिवसापूर्वी बाहेरगावी जाण्यासाठी वडिलांनी गाडी मागितली. पण ती देण्यास मुलाने नकार दिल्यावर बापाने शिवीगाळ केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही वाद घालत बापाने मुलाला शिवीगाळ केली. त्याचा जाब मुलगा अक्षय याने विचारताच झटापट झाली. त्यात वडिलांनी मुलाच्या पोटाचा चावा घेतला. यामुळे अक्षयला गंभीर इजा झाली. अक्षयने पोलीसांना सूचित केल्यावर ते घरी पोहचले. तक्रार करण्यात आल्यावर दहेगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father bit the son because he did not give the bike pmd 64 mrj