नागपूर : पत्नी नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी गेल्यानंतर सख्ख्या बापाने मध्यरात्री १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केले. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना कळमन्यात उघडकीस आली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी बापाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय आरोपी पत्नी व दोन मुलींसह कळमन्यात राहतो. तो बेरोजगार असून पत्नीच्या कमाईवर जगतो. त्याला दारुचे व्यसन असून तो घरात मित्रांना घेऊन रोज दारु पित असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या तीन दिवसांपूर्वी पत्नी एका नातेवाईकाकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती. घरी १४ वर्षे आणि १० वर्षीय मुलगी होती. आरोपी बाप दारु पिऊन घरी आला. झोपेत असलेल्या मुलीला बघून त्याच्या अंगातील सैतान जागी झाला. त्याने मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या मुलीशी अश्लील चाळे करायला लागला. मुलगी झोपेतून जागी झाली. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता बापाने तिचे तोंड दाबले. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्याशी रात्रभर त्याने अश्लील चाळे केले.

हेही वाचा >>> वर्धा : वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात राडा; भाजप नेत्यांना धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव

सकाळी उठल्याबरोबर ती शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरी गेली. तिला रात्री वडिलांनी केेलेला सर्व प्रकार सांगितला. त्या महिलेने मुलीच्या आईला दूरध्वनी करुन माहिती दिली. ती महिला लगेच घरी आली. मुलीसह कळमना पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार प्रवीण काळे यांना माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.

हेही वाचा >>> “बंडखोरी नव्हे हा तर उठाव,” ब्रिजभूषण पाझारे २४ तासांनंतर अवतरले अन्…

घरासमोरच तरुणीशी गैरवर्तन

नागपूर : एका टवाळखोराने घरासमोर उभ्या तरुणीशी गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना सदर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. गत अनेक दिवसांपासून आरोपी तरुणीला त्रास देत होता. या प्रकरणी पोलिसांनी पीडित १८ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून परिसरातच राहणाऱ्या राजेश राजू वरखडे (४०) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. राजेश गत काही दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करून त्रास देत होता. सोमवारी पीडिता घरासमोर उभी होती. दरम्यान राजेश तिच्या जवळ आला. तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. पीडितेने विरोध करीत आरडा-ओरड केली असता राजेश पळून गेला. पीडितेने घटनेची तक्रार पोलिसात केली. पेालिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून राजेशचा शोध सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father held for molesting 14 year old girl in nagpur adk 83 zws