चंद्रपूर: ‘वाचाल तर वाचाल’, नवरगाव येथे विदर्भातील पहिली वाचन संस्कृती कार्यशाळा

टीव्ही आणि मोबाईलच्या या युगात माहितीचा तसा विस्फोट झालेला आहे. प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड फोन असल्याने मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर क्रियाशील राहणे, स्क्रीनवरील वाचणे, व्हिडिओ पाहणे यात समाजातील बऱ्याच लोकांचा वेळ जात आहे.

First Reading Culture Workshop in Vidarbha at Nawargaon chandrapur
‘वाचाल तर वाचाल’, नवरगाव येथे विदर्भातील पहिली वाचन संस्कृती कार्यशाळा

टीव्ही आणि मोबाईलच्या या युगात माहितीचा तसा विस्फोट झालेला आहे. प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड फोन असल्याने मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर क्रियाशील राहणे, स्क्रीनवरील वाचणे, व्हिडिओ पाहणे यात समाजातील बऱ्याच लोकांचा वेळ जात आहे. पुस्तक हातात घेऊन वाचण्याची सवय हळूहळू मोडत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भात सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगावाच्या पुढाकारातून हरिती प्रकाशनच्या वाचन चळवळीच्या सहयोगाने वाचन संस्कृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय शिक्षण संस्थेचे श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव जि. चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठ स्तरीय दोन दिवशीय स्व. परमानंद पाटील बोरकर स्मृती वाचन संस्कृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील १२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातही मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>>बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी, चंद्रपूर जिल्ह्यात २८ एप्रिलला निवडणूक

माणसाचा ‘स्व’ कसा घडत आला असून ‘शारीरिक स्व’ आणि ‘सामाजिक स्व’ याची सहभागींना ओळख करून देण्यात आली. भाषेचा शोध, लिपीचा शोध, कम्युनिकेशन, संवाद, वाचन आदी बाबींची संवादात्मक पद्धतीने मांडणी करण्यात आली. वाचन ही प्रक्रिया कशी मनाचा व्यायाम असते आणि त्यामुळे आजच्या संदर्भात कणखर मनाचा माणूस होण्यासाठी वाचन करणे कसे गरजेचे आहे हे सहभागींना समजून सांगण्यात आले. कार्यशाळेतील मुला-मुलींचा सहभाग अतिशय उत्साहवर्धक होता. गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. शैलेंद्र देव यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली डोरलीकर यांनी केले, तर आभार डॉ. उमेश इंदुरकर यांनी मानले. कार्यशाळा समन्वयक गजानन कोरतलवार यांनी आयोजनाची भूमिका विशद केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे यांनी परमानंद पाटील बोरकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. हरिती वाचन चळवळीच्या वतीने धनंजय कानगुडे आणि दीपक कसाळे यांनी ही कार्यशाळा घेतली.

हेही वाचा >>>सात महिन्यांच्या बंदीवासानंतर चित्त्यांनी ठोकली धूम! नामिबियातील चित्ते अखेर कुनोच्या खुल्या जंगलात

कार्यशाळेचे उद्घाटन झाले त्यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर, प्रमुख अतिथी सदानंद बोरकर तसेच संस्थेचे पदाधिकारी सुधाकर बोरकर, सुखदेव पाटील आनंदे, सिद्धार्थ बोरकर, भारत विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक रूपा सावरकर, श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल कामडी आदी मान्यवर उद्घाटन समारंभात आवर्जून उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 17:23 IST
Next Story
बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी, चंद्रपूर जिल्ह्यात २८ एप्रिलला निवडणूक
Exit mobile version