Premium

मिठाईच्या डब्यांवर उत्पादनाची तारीखच नाही; नागपूरात ‘एफडीए’कडून कुणावर कारवाई पहा..

विदर्भातील सर्वाधिक मिठाई विक्रेते- उत्पादक नागपूरात आहेत. एप्रिल- २०२२ ते आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उत्पादनाच्या तपासण्या केल्या.

food and druge administration
मिठाईच्या डब्यांवर उत्पादनाची तारीखच नाही; नागपूरात ‘एफडीए’कडून कुणावर कारवाई पहा.. ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

नागपूर: विदर्भातील सर्वाधिक मिठाई विक्रेते- उत्पादक नागपूरात आहेत. एप्रिल- २०२२ ते आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उत्पादनाच्या तपासण्या केल्या. त्यापैकी ४२ अस्थापनांनी मिठाईच्या डब्यांवर उत्पादन व ते मुदतबाह्य कधी होणार याची तारीख टाकली नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सणासुदीत मोठया प्रमाणात दुध, खोवा, मिठाईची विक्री होते. हे पदार्थ नागरिकांना दर्जेदार मिळायला हवे. त्यासाठी एफडीएकडून उत्पादक- विक्रेत्यांची तपासणी केली जाते. एप्रिल- २०२२ ते २० सप्टेंबर २०२३ पर्यंत एफडीएने नागपूर जिल्हयातील मिठाई विक्रेते, उत्पादक, रेस्टॉरेन्ट ईत्यादी व्यवसायिकांच्या तपासण्या केल्या. त्यात ४२ प्रतिष्ठानातील मिठाईवर उत्पादन व मुदतबाह्य तिथी नसल्याने या व्यवसायिकांवर कारवाई केली.त्यांच्याकडून२ लाख ७९ हजार रुपये दंड वसूल केला.

हेही वाचा >>>चंद्रपूर : सरकारने महापूर व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने, केवळ १७ हजार रुपये मिळणार

या काळात जिल्ह्यात नमकीन, खोवा, बर्फी, कलाकंद बर्फी, मोदक, रसगुल्ला, पेढा, काजुकतली, लाडु, बुंदी, गुलाबजामुन, श्रीखंड, ऑईल, वनस्पती व कोकोनट पावडरचे १२९ नमुने तपासणीला प्रयोगशाळेत पाठवले. त्यापैकी १०१ नमुने प्रमाणित तर १२ नमुने मानकाप्रमाणे नव्हते. यापैकी तीन व्यावसायिकांवर खटले दाखल करण्यात आले तर उर्वरितांकडून १ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला, असे एफडीए कडून कळवण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Food and drug administration inspections of the product have found that candy containers do not list the product expiration date in nagpur mnb 82 amy

First published on: 21-09-2023 at 20:15 IST
Next Story
चंद्रपूर : सरकारने महापूर व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने, केवळ १७ हजार रुपये मिळणार