नागपूर: माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट|former mla jogendra kawade met the cm eknath shinde in nagpur | Loksatta

नागपूर: पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दुसरीकडे ऊध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी पावले उचलली आहेत.

नागपूर: पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
नागपूर: माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे एकदम बदलली. भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गट विस्ताराचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. काही संघटना, पक्षाचे नेते त्याची भेट घेऊ लागले. दुसरीकडे ऊध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी पावले उचलली आहेत.

या पार्श्वभूमीवर पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी विधान परिषद सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र व पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे होते. यावेळी राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे कवाडे यांच्याकडून कळवण्यात आले. कवाडे यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यावर त्यांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली हे येथे उल्लेखनीय.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 10:08 IST
Next Story
नागपूरातील वैद्यकीय महाविद्यालयात ‘रॅगिंग’, ‘व्हिडीओ व्हायरल’ झाल्याने खळबळ; सहा विद्यार्थ्यांवर कारवाई