नागपूर: सोन्याचे दर बघता- बघता विक्रमी उंचीवर पोहचले आहे. हे दर शुक्रवारी (६ मे २०२५) नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर पून्हा वाढण्याचे संकेत होते. परंतु उलट चार तासातच दरात घसरण झाली आहे. दरम्यान मुस्लिम बांधवांचा ‘बकरी ईद’चा सन तोंडावर असतांनाच दर घसरल्याने ग्राहकांना आंशिक दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सोन्याचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.
करोनानंतर सोन्याचे दर झपाट्याने वाढले होते. परंतु जम्मू कश्मिरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. या काळात हे दर घसरले. परंतु शस्त्रसंधीनंतर सोन्याचे दर पून्हा वाढत- वाढत विक्रमी उंचीवर गेलेले दिसत आहे. सोन्याचे दर रोज दरवाढीने नवीन विक्रम नोंदवत असतांनाच शुक्रवारीही सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर वाढून नवीन विक्रम नोंदवण्याचे संकेत होते. परंतु चारच तासात दरात घसरण झाली.
नागपुरातील सराफा बाजारात ६ जून २०२५ रोजी बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९७ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ७६ हजार ३०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर १ तासांनी ११ वाजता वाढून २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९८ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर त्यानंतर एक तासांनी दुपारी १२ वाजता दरात घसरण झाली.
यावेळी सोन्याचे दर घसरून २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९७ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. तर दुपारी ३ वाजता सोन्याचे दर आणखी घसरून २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९७ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ३०० रुपये नोंदवले गेले.
चांदीच्या दरातही बदल…
नागपुरातील सराफा बाजारात ६ जून २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता १ लाख ६ हजार ३०० रुपये होते. हे दर एक तासांनी ११ वाजता १ लाख ६ हजार ७०० रुपये, दुपारी १२ वाजता १ लाख ६ हजार ५०० रुपये तर दुपारी ३ वाजता १ लाख ६ हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले.