नागपूर: सोन्याचे दर एक लाखाहून वर विक्रमी उंचीवर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु आता हळू- हळू या दरात घसरण होतांना दिसत आहे. शुक्रवारीही (२५ जूलै २०२५) सोन्याचे दर घसरल्याचे दिसत आहे. या दराबाबत आपण जाणून घेऊ या.
सोन्याचे दर १३ जूनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून एक लाखावर गेले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु त्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून सातत्याने सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम एक लाखाहून जास्तवर होते. सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचल्यावर ग्राहकांमध्ये चिंता असतांनाच सलग दोन दिवस सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सराफा बाजारात २३ जुलै २०२५ रोजी पावसाळ्याच्या दिवसांत सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७८ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार ६०० रुपये होते.
दरम्यान हे दर दुसऱ्या दिवशी २४ जूलैला दुपारी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर तिसऱ्या दिवशी २५ जूलै २०२५ रोजी सोन्याचे दर दुपारी १ वाजता घसरून मागील चार दिवसांतील निच्चांकी पातळीवर आले आहे. नागपुरात २५ जूलैला दुपारी १ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम सोन्याचे दर ९९ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. दरम्यान नागपुरात २१ जूलैला सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये ९९ हजार रुपयापर्यंत प्रति दहा ग्राम आले होते. त्यानंतर दर एक लाखावर गेले होते. आता पून्हा ९९ हजारापर्यंत खाली आले आहे.
चांदीच्या दरातही घसरण…
नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो २३ जुलैला १ लाख १६ हजार ७०० रुपये होते. हे दर २४ जुलैला प्रति किलो १ लाख १५ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. तर २५ जुलैला शुक्रवारी चांदीचे दर प्रति किलो १ लाख १६ हजार २०० रुपये नोंदवले गेले.