Current Gold Rate : नागपूर : दसऱ्याच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. परंतु दसऱ्याच्या एक दिवसापूर्वी सोन्याच्या दराने सर्वसामान्य ग्राहकांना धडकी भरली आहे. सराफा दुकानदारांनाही सोन्याच्या दरामुळे विक्रीवर परिणामाची चिंता आहे. दरम्यान महिन्याच्या पहिल्या दिवशी (१ ऑक्टोंबर २०२५) सोन्याचे दर काय होते? त्याबाबत आपण जाणून घेऊ या. देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात सोने- चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नागपूरसह विदर्भाच्या वेगवेगळ्या भागातीलही ग्राहक मोठ्या संख्येने येतात.
नागपुरात पारंपारिक सराफा व्यवसायिकांच्या प्रतिष्ठानासह नावाजलेल्या मोठ्या ब्रांडचे सराफा शोरूम असणे, हे त्यामागचे कारण आहे. दरम्यान दसऱ्याला मोठ्या संख्येने नागरिक सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. तर लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाकडूनही या दिवसात दागिने खरेदी केले जातात. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात महिन्याच्या पहिल्या दिवशी (१ ऑक्टोंबर २०२५) रोजी सोन्याच्या दराने नवीन विक्रम नोंदवला आहे. या दिवशी नागपुरात सोन्याचे दर दुपारी १.४२ वाजता २४ कॅरेटसाठी चक्क १ लाख १७ हजार ६०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले आहे. हे दर आजपर्यंतच्या इतिहासात जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून सर्वोच्च असल्याचा सराफा दुकानदारांचा दावा आहे. सोन्याचे वाढलेले दर बघता ग्राहकांकडून नेहमीच्या तुलनेत कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती दिली जाण्याचे संकेत विविध ग्राहक संघटनांकडून वर्तवले जात आहे.
नागपुरातील सोन्याचे दर
नागपुरातील सराफा बाजारात १ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी १.४२ वाजता सोन्याचे दर प्रति दहा ग्राम जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून २४ कॅरेटसाठी १ लाख १७ हजार ६०० रुपये होते. हे दर २२ कॅरेटसाठी १ लाख ९ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ९१ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ७६ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. दरम्यान नागपुरातील सराफा बाजार उघडलयावर मात्र सोन्याचे दर १ ऑक्टोंबरला सकाळी १० वाजता २४ कॅरेटसाठी १ लाख १७ हजार १०० रुपये होते. हे दर २२ कॅरेटसाठी १ लाख ८ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ९१ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ७६ हजार १०० रुपये नोंदवले गेले होते. त्यामुळे सकाळच्या तुलनेत दुपारी दरात आणखी वाढ झालेली दिसत आहे.
चांदीचे दर…
नागपुरात चांदीचे दरही झपाट्याने वाढत आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी १ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी १.४२ वाजता नागपुरात चांदीचे दर प्रति किलो १ लाख ४६ हजार ५०० रुपये नोंदवले गेले.