नागपूर: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस शनिवारपासून तीन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत.राज्यपाल शनिवारी रात्री नागपूरला येणार आहेत. या दिवशी त्यांचा राजभवन येथे मुक्काम आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी ते वर्धा येथे जाणार असून तेथे महाकाली शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी ४ सप्टेबरला नागपूर विद्यापीठाव्दारे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईला रवाना होतील,असे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor ramesh bais on three days visit to nagpur cwb 76 amy