अकोला: उत्तर पश्चिम रेल्वे झोनमध्ये ‘यार्ड रिमॉडलिंग’ तांत्रिक कामे करण्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला मार्गे धावणारी हैदराबाद – जयपूर एक्सप्रेसच्या एकूण आठ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबाद-जयपूर एक्सप्रेस अकोलामार्गे धावते. गाडी क्रमांक १२७२० हैदराबाद -जयपुर एक्सप्रेसची २७, २९ नोव्हेंबर, ०४ आणि ०६ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

हेही वाचा… “अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेची कसून चौकशी करा,” विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

गाडी क्रमांक १२७१९ जयपुर – हैदराबाद एक्सप्रेसच्या २९ नोव्हेंबर, ०१, ०६ आणि ०८ डिसेंबर रोजीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन गर्दीच्या हंगामात हैदराबाद – जयपूर गाडीच्या आठ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad jaipur express have been cancelled due to technical works in the north western railway zone ppd 88 dvr