अकोला : जिल्ह्यात गुटख्याची अवैधरित्या साठवणूक केली जात आहे. तेल्हारा येथे गोपाल टॉकीज मागे एका घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याच्या माहितीवरून अकोट पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १२ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. तेल्हारा येथील रहिवासी रवि हरिचंद फुलवंदे व २९ वर्ष यांच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांना मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या माहितीवरून त्यांनी पाळत ठेवून फुलवंदे यांच्या घरात छापा टाकला. त्यानंतर त्याच्या घरातून प्रतिबंधित असलेला विविध कंपनीचा सुमारे १२ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रितू खोकर, सचिन जाधव, गजानन इंगळे, कादीर गवळी, संतोष मेहंगे, शेख सलमान, अभिजीत पांडे, गौरव डाबेराव यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal storage of gutkha in akola district police raid ppd 88 ysh