नागपूर : राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. आधी कडाक्याची थंडी, त्यानंतर पाऊस आणि आता पुन्हा एकदा थंडी परतली आहे. विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नागपूर येथे करण्यात आली. किमान तापमानात तब्बल साडेपाच अंशाची घसरण झाली असून आज ८.८ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षात राज्यातील वातावरणात सातत्याने बदल घडून आले. आता नवीन वर्षातही वातावरणात बदल दिसून येत आहे. डिसेंबर अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पारा घसरलाय. त्यामुळे त्याठिकाणी गुलाबी जाणवत आहे. तर विदर्भात मात्र अवघ्या २४ तासात वातावरणात बदल झाला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमान साडेपाच अंशाने कमी झाले असून ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन जानेवारीला निरभ्र आकाश असून तेथील किमान तापमान बारा अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा… नागपूर : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन ठार

छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात इतर शहरांच्या तुलनेत जास्त घट झालेली दिसून येत आहे. विदर्भातील नागपूर शहरात दोन जानेवारीला निरभ्र आकाश असणार आहे. नागपूरमधील किमान तापमानात देखील तीन ते चार अंशांनी घट झालेली दिसून येत आहे. तेथील कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस इतके होते. विदर्भात गेले काही दिवस ढगाळ आकाश कायम होते. त्यामुळे तूर पिकाचे भरपूर नुकसान झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विदर्भातून ढगाळ वातावरण गायब झाल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळालाय. दोन जानेवारीला नाशिकमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळाला. नाशिकमधील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील किमान तापमानात देखील दोन ते तीन अंशांनी घट झालेली पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा… वाल्मीक कराड, बीड पोलीस स्टेशन अन् पाच बेड… विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

पुढील काही दिवसांत नाशिक मधील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या वर्षातील हवामानातील बदलानंतर नवीन वर्षात राज्यात थंडीचा जोर थोडासा वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुढील काही दिवसांत राज्यातील किमान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. म्हणजेच राज्यातील वातावरणात आणखी बदल घडून येणार आहे. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.