चंद्रपूर : २०१९ ची विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झालो. मात्र, २०२४ ची विधानसभा निवडणूक एका राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढणार, अशी माहिती अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. ‘तो’ पक्ष कोणता, हे त्यावेळचे राजकीय समीकरण आणि भविष्यातील स्वत:च्या राजकीय वाटचालीचा आढावा घेऊनच ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोरगेवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. आमदार म्हणून निवडून येण्याची इच्छा होती आणि भविष्यातही केवळ विधानसभेचीच निवडणूक लढणार आहे. लोकसभा मतदार संघ मोठा असतो, सध्या आपली ताकद तिथवर पोहचू शकत नाही. २०२४ ची विधानसभा निवडणूक कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवेल. हा पक्ष भाजपही असू शकतो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अथवा इतर कोणताही पक्ष असू शकतो.

हेही वाचा >>> “चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते, पण…”, धानोरकर कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार यांचे विधान

 सध्याचे राजकारण पाहिले तर पक्षनिष्ठा आज राहिली नसल्याचे दिसून येते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाची व राज्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होईल. यावेळी जोरगेवार यांनी त्यांच्या ‘यंग चांदा ब्रिगेड’ची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केल्याची माहिती दिली. आ. जोरगेवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांशी जवळीक आहे. त्यामुळे जोरगेवार शिवसेनेत (शिंदे गट) जातात की भाजपमध्ये प्रवेश करतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याशिवाय, आम आदमी पार्टी आणि भारत राष्ट्र समितीकडूनही आ.जोरगेवार यांना पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्याचे त्यांनी स्वत:हा सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent mla jorgewar informed upcoming assembly election fought on the symbol political party rsj 74 ysh
First published on: 04-06-2023 at 10:38 IST