मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वतीने इतवारी रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इतवारी रेल्वेस्थानकाचे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक’ असे नामकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी देशभरातील १ हजार ५०० रेल्वे भुयारी मार्ग (आरयूबी)चे लोकार्पण तसेच अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ५५४ विकासकामांचे आभासी पद्धतीने भूमिपूजन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवाद्यास अटक

नागपुरात मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यावतीने इतवारी रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते इतवारी रेल्वेस्थानकाचे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानक’ असे नामकरण करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या डीआरएम नमिता त्रिपाठी आदींची प्रमुख उपस्थिती होती.  मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर विभागात १३५.४४ कोटी रुपयांचे ३६ भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. तर अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या १५ रेल्वेस्थानकांचा समावेश असून तीन रेल्वेस्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १२ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. इतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी १२.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itwari station renamed as netaji subhash chandra bose itwari railway station rbt 74 zws