गोंदिया :महाकुंभमेळात  मौनी अमावस्या ला उसळलेल्या भाविकांच्या गर्दी मुळे चेंगराचेंगरीत ३९ भाविकांचा मृत्यू असो किंवा शनिवार १५ फेब्रुवारी रोजी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराज जाणाऱ्या गाडीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक बदलल्यामुळे १५ भाविकांचा धावपळ आणि चेंगराचेंगरीत मृत्यू असो किंवा बिहार राज्यात जागा मिळावी याकरिता रेल्वेच्या वातानुकूलित बोगींची प्रवाशांकडून केलेली तोडफोड असो किंवा प्रयागराज येथे भाविकांच्या अफाट गर्दीमुळे होत असलेली अव्यवस्था असो अशा कुठल्याही घटनांची तमा न बाळगता सगळीकडून  प्रयागराज महाकुंभमेळात जाण्यासाठी  भाविकांचा वाढलेला ओढा बघता भाविकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया आणि इतवारी जंक्शन मधून पुढील काही ठराविक दिवशी विशेष गाडी कुंभमेळाकरिता चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पुढील १८,२०,२१ आणि २३ फेब्रुवारी या दिवशी या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रेन क्र. ०८८६७ गोंदिया-तुंडला कुंभमेळा विशेष ट्रेन १८ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने चालवल्या जाणाऱ्या सहलीसाठी चालवली आहे. महाकुंभमेळ्या दरम्यान ट्रेनमध्ये जास्त गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त निश्चित बर्थ/आसन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला सुध्दा ०८८६८ तुंडला-गोंदिया कुंभमेळा विशेष ट्रेन तुंडला येथून १९ फेब्रुवारी रोजी चालविण्यात येत आहे. द.पू.मध्य रेल्वे कङून धावणाऱ्या कुंभमेळा विशेष ट्रेनला डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भाटपारा, उसलापूर, पेंड्रारोड, अनुपपूर, शहडोल, उमरिया, न्यू कटनी जंक्शन, कटनी, मैहर, सतना जंक्शन, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, फतेहविंदपूर, टी. जंक्शन, टी. सदर ही गाडी गोंदियाहून सकाळी ८:२० वाजता सुटेल आणि डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता टुंडला येथे पोहोचेल.तीच दिशा विरुद्ध ही ट्रेन टुंडला येथून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि इटावा, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, माणिकपूर मार्गे १५:२० वाजता गोंदियाला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०८८६३ इतवारी-तुंडला ही २० फेब्रुवारी ला आणि ट्रेन क्रमांक तुंडला-इतवारी २१ फेब्रुवारीला चालेल. या गाडीचा थांबा भंडारा रोड, तुमसर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, मदनमहल, कटनी, मैहर, सतना जंक्शन, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी, इटावा रेल्वे स्थानकांवर असेल. तर २३ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून ट्रेन क्रमांक ०८८६८ गोंदिया-तुंडला कुंभमेळा विशेष गाडी चालवली जात आहे. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला सुध्दा ०८८७० तुंडला गोंदिया कुंभमेळा विशेष ट्रेन तुंडला येथून २४ फेब्रुवारी रोजी चालविण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे  वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh mela 2025 railways will run special trains on february 18 20 21 and 23 sar 75 amy