नागपूर : वाडीत राहणाऱ्या एका चार वर्षीय मुलाला सिगारेटचे चटके दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिमुकल्यांच्या आईसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या आरोपीने हा प्रकार केला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठच दिवसांपूर्वी हुडकेश्वरमध्येसुद्धा एका १२ वर्षीय मुलीला सिगारेटचे चटके दिल्याचे प्रकरण ताजेच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संकेत रमेश उत्तरवार (३२, वडधामना) असे आरोपीचे नाव आहे. तो पती गमावलेल्या एका महिलेसोबत वडधामना परिसरातच राहतो. त्या महिलेला सहा वर्षे व चार वर्षांचे वय असलेली दोन मुले आहेत. मात्र, दोन्ही मुले माझी नाहीत असे म्हणत संकेत नेहमी त्यांचा छळ करायचा व मारायचा. त्यातूनच त्याने काही दिवसांअगोदर चार वर्षांच्या चिमुकल्याला लहानसहान गोष्टींवरून चटके देण्यास सुरुवात केली. तो सिगारेट किंवा इतर वस्तूने चटके द्यायचा. आश्चर्याची बाब म्हणजे आईकडूनदेखील फारसा विरोध होत नव्हता.

हेही वाचा >>> पोलीस ठाण्यातील महिला मदत कक्ष वाऱ्यावरच; केंद्राने जाहीर केलेला निधी मिळालाच नाही

या मुलांच्या दिवंगत वडिलांच्या आईला ही बाब एका ओळखीच्या व्यक्तीकडून कळाली. तिने स्वत:च्या डोळ्यांनी हा प्रकार पाहिल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थेट वाडी पोलीस ठाणे गाठले व आरोपीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी संकेतविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लगेच शोधमोहीम राबवली व संकेतला अटक केली. तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत असून ‘लिव्ह इन’मध्ये राहत होता, अशी माहिती वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी दिली.

असा उघडकीस आला प्रकार

चार वर्षीय मुलाच्या आईवडिलांचे सात वर्षांअगोदर लग्न झाले होते. दोन मुले झाल्यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर तिची सून दोन मुलांना घेऊन तिच्या आईच्या घराजवळ रहायला गेली. संकेत तिच्यासोबत राहत होता. त्यांनी अधिकृतपणे लग्न केले की नाही याबाबत कुणालाही नेमकी कल्पना नाही. दरम्यान, मुलांच्या आजीला एका नातेवाईकाने फोन करून चार वर्षीय मुलाच्या चेहरा, पाठीवर व पोटावर जळाल्याचे मोठे डाग दिसत असल्याचे सांगितले. आजीने त्यांचे घर गाठले व नातवाला जवळ घेऊन विचारणा केली. तो सांगण्यास नकारच देत होता. त्याला लाडाने विचारले असता रडत रडत त्याने घडलेला प्रकार सांगितला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man beat with horrific cigarette burns to four year old boy in nagpur adk 83 zws
First published on: 12-09-2023 at 09:28 IST