Mist in Buldhana District rabbi crops will be hit Scm 61 ssb 93 | Loksatta

बुलढाणा जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य; रब्बी पिकांना बसणार फटका, शेतकरी चिंतेत

बुलढाणा चिखली मार्गावर सकाळी अगदी दहा फुटांवरचेही अंधुक दिसत असल्याने सकाळीही वाहनांचे दिवे लागले होते. यामुळे वाहतूक रेंगाळली.

Mist Buldhana District
बुलढाणा जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य (image – लोकसत्ता टीम)

जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात आज सकाळी धुक्याचे साम्राज्य पहावयास मिळाले. रब्बी पिकांसाठी मात्र हे धुके घातक असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

बुलढाणा चिखली मार्गावर सकाळी अगदी दहा फुटांवरचेही अंधुक दिसत असल्याने सकाळीही वाहनांचे दिवे लागले होते. यामुळे वाहतूक रेंगाळली. चिखली तालुक्यातील केळवद परिसरालाही धुक्याने विळखा घातला होता.

हेही वाचा – नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला

हेही वाचा – बुलाढाणा : नात्याला काळिमा, काकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हा नजारा रसिकांसाठी सुखावणारा असला तरी अडीच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांना व आंब्यासाठी मात्र घातकच आहे. सलग तीन दिवसांपासून असणाऱ्या या धुक्यामुळे फुलोऱ्यावर आलेल्या रब्बी पिकांची वाढ खुंटणे, किडीचा प्रादुर्भाव व उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. गव्हाच्या ओंब्या लहान होऊन दाण्याचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, सर्वाधिक पेरा असलेल्या हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हळद पिकालाही या धुक्याचा फटका बसला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 14:47 IST
Next Story
बुलाढाणा : नात्याला काळिमा, काकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार