scorecardresearch

बुलाढाणा : नात्याला काळिमा, काकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आरोपीला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक केली.

physical abuse minor girl buldana
नात्याला काळिमा, काकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार (प्रातिनिधिक छायाचित्र)

नात्याने काका लागणाऱ्या नराधमाने बळजबरीने पंधरा वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने अखेर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आरोपीला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक केली.

हेही वाचा – “आंबेडकर-ठाकरे युतीचा ‘मविआ’शी काहीही संबंध नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्यपालांतर्फे शिंदे-फडणवीस यांना..”

हेही वाचा – नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान या मुलीने मावशीचा पती असलेल्या नराधमाचा छळ सहन केला. जवळचा नातेवाईक असल्याने त्याचे पीडितेच्या घरी येणे जाणे होते. त्याचा गैरफायदा घेत त्याने तिला जाळ्यात ओढले. तिच्या शाळेत जाऊन भेटणे सुरू केले. एके दिवशी तिला बुलढाण्यातील एका ‘लॉज’मध्ये नेऊन त्याने बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. यामुळे त्रस्त मुलीने अखेर चिखली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला गेवराई येथून अटक करून त्याच्याविरुद्ध पोक्सो, बलात्कार व विनयभंगच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 13:51 IST
ताज्या बातम्या