उद्या १५० एकर जमिनीचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शासनातील शिंदे गटातील बऱ्याच मंत्रांचे घोटाळे महाविकास आघाडीकडून काढून त्यांना टार्गेट केले जात आहे.

हेही वाचा >>> नागपूर: हा तर सीमावासीयांच्या लढ्याचा अपमान- लाड

या मालिकेत आणखी एक घोटाळा जोडण्याचे संकेत आव्हाड यांनी दिले. आव्हाड पुढे म्हणाले, उद्या एक घोटाळा काढणार आहे. त्याला बॉम्ब स्फोट म्हणणार नाही. हायड्रोजन बॉम्ब फोडला तरी हे सरकार उठणार नाही. सरकार कुंभकर्णी झोपेत आहे.