नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी तीन महिन्यांआधी स्थगिती देण्यात आली होती. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यावर आयोगाने याची दखल घेत सुधारित जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आता १८ ऑगस्टला परीक्षा होणार आहे.
‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ ही परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. परंतु, समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. लोकसत्ताने याविषयाला वाचा फोडल्यावर आयोगाने याची दखल घेत मंगळवारी शुद्धीपत्र जाहीर केले. त्यानुसार आता १८ ऑगस्टला परीक्षा होणार असून आधी खुल्या वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणानुसार अर्ज करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांनी कुणबी नोंदणीच्या आधारे इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र तयार केले आहेत. त्यांना ओबीसीमधून अर्ज करता येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले.

हेही वाचा – वर्धा : भुकेल्या वन्यप्राण्यांचा आता पाळीव प्राण्यांवर हल्ला, वाघ की बिबट…

हेही वाचा – आनंदवार्ता! अकोला जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल, विजांच्या कडकडाटासह मुसळधार, शेतकऱ्यांची लगबग

१२ ते २६ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. ‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ४१, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २२, गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc announced the date of social welfare exam exam will be held on this date dag 87 ssb