नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकतीच राज्यसेवा २०२४ ची परीक्षा घेण्यात आले. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये दीड हजारावर विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेली आहे.

मात्र या परीक्षेमध्ये लागलेला कट ऑफ होऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आजपर्यंतचा सर्वाधिक कट ऑफ या परीक्षेत लागल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला आहे. या परीक्षेत ओपनचा कट ऑफ ५०७.५० लागला आहे. अनुसूचित जातीचा ४४७ तर अनुसूचित जमातीचा ४१५ कट ऑफ लागला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बुधवारी (९ एप्रिल) रोजी प्रसिद्धपत्रक काढत माहिती दिली. त्यामध्ये आयोग म्हणाले आहे की, विषयांकित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या प्रवेशाकरीता पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी संदर्भिय दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजीच्या शुध्दीपत्रकान्वये दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

तांत्रिक अडचणीमुळे अर्ज सादर करण्यास अडथळा निर्माण असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात काही उमेदवारांकडून विविध माध्यमातून मागणी होत असल्याचे आयोगाच्या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र एकूण ७९७० उमेदवारांपैकी एकूण ७७३२ उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते. उर्वरित पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरीता ऑनलाईन अर्जप्रणाली सुरळीत असून उमेदवारांकडून अर्ज सादर केले.

तसेच अर्ज सादर करण्यासंदर्भातील उमेदवारांच्या अडचणी / शंकांचे निराकरण सुविधा केंद्र (हेल्पडेस्क) व आयोगाच्या कार्यालयाकडून केले जात आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करताना अडचणी /शंका असतील अशा उमेदवारांनी सुविधा केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ७३०३८२१८२२ व०२२६९१२३९१४ वर किंवा आयोगाच्या कार्यालयाच्या contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क करुन आवश्यक मदत प्राप्त करुन घेण्याची सुविधा दिली होती.

प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाद्वारे उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी विहित कालावधीतच अर्ज सादर करण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. विहित मुदतीनंतर अर्ज सादर करण्यासंदर्भातील अथवा परीक्षा शुल्काचा भरणा करण्यासंदर्भातील कोणत्याही विनंतीचा विचार करण्यात येणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली होती. यानंतर या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये दीड हजारावर विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेली आहे. मात्र यावर्षीचा कटऑफ प्रचंड वाढल्याने विद्यार्थ्यांना चिंता निर्माण झाली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ करीता अर्ज सादर करण्याबाबत विद्यार्थ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्या तक्रारी विद्यार्थी विविध माध्यमांतून आयोगापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत होते.

बऱ्याचदा आयोगाची वेबसाईट उघडत नव्हती तर काही वेळा अर्ज सबमिट होत नव्हते. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ या परीक्षेची अर्ज भरण्याची तारीख ९ एप्रिलवरून अजून वाढवावी अशी मागणी होत होती. या मागणीवर आयोगाने उत्तर दिले आहे. परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या जवळपास सर्व उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढणार नाही, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले होते.

आज राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला. मागील परीक्षांच्या तुलनेत या परीक्षाचे कट ऑफ जास्त आहे. दिवसांदिवस स्पर्धा परीक्षा आव्हानत्मक होतं आहे. आपण मागील काही वर्षांचा कट ऑफ पाहिला तर ४५० पर्यंत होता पण यावेळी ५००पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत. परीक्षांची काठीन्य पातळी पाहून अभ्यास केला पाहिजे. -महेश घरबुडे. अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विध्यार्थी असोसिएशन.