MSBSHSE Maharashtra SSC 10th Board Result Passing Percentage: बारावीच्या निकालात थेट तळाला फेकल्या गेलेल्या बुलढाणा जिल्ह्याला दहावीच्या निकालाने काहीसा दिलासा दिला आहे. दहावीच्या निकालात जिल्ह्याने मुसंडी मारत विभागात तिसरे स्थान गाठले आहे. बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५.३६ टक्के इतका लागला आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला मागे टाकत जिल्ह्याने तिसरे स्थान गाठले आहे.

मागील काही वर्षात दहावी व बारावीच्या निकालात आघाडीवर राहणाऱ्या बुलढाण्याचा बारावीचा निकाल कमी लागल्याने जिल्हा अमरावती विभागात शेवटच्या स्थानावर फेकला गेला होता. यामुळे दहावीच्या निकालाने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुली आघाडीवर असण्याची परंपरा यंदाही कायम आहे. मुलींची टक्केवारी ९७.०२ तर मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ९३.९९ इतकी आहे. परीक्षा देणाऱ्या ३९ हजार ९८२ पैकी ३८१२७ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे.

दरम्यान ९८.१२ टक्केसह सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. नांदुरा ९१.७२ टक्केसह सर्वात तळाशी आहे.