लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : छायाचित्रकार विनय पुणेकर हत्याकांडाला वेगळेच वळण लागले असून या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी साक्षी गोव्हर (३२, रा. मानकापूर) हिला अटक केली असून गोळी झाडणारा तिचा नवा प्रियकर शुक्ला अद्याप फरार आहे. त्याला शोधण्यासाठी एक पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे.

शनिवारी दुपारी दीड वाजता सदरमधील राजनगरात गोळ्या घालून विनय पुणेकर यांचा भरदिवसा घरात घुसून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. एक युवक प्रवेशद्वार उघडून घरात घुसला. त्याने पुणेकर यांच्यावर गोळीबार केला आणि लगेच त्याने पळ काढला. काही वेळात पुणेकर यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तपासात आरोपी महिला साक्षी गोव्हर हिला ताब्यात घेतले. तिने प्रियकर शुक्ला याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.

आणखी वाचा-‘सामाजिक न्याय’ परीक्षेला मुहूर्त कधी? तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि विनय हे दोघेही काही वर्षांपूर्वी संपर्कात आले होते. साक्षीच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती विनय यांच्या प्रेमात पडली. दोघांचेही अनैतिक संबंध होते. दरम्यान, साक्षीचे मध्यप्रदेशातील शुक्ला नावाच्या युवकाच्या प्रेमसंबंध जुळले. त्याने विनयशी असलेले प्रेमसंबंध तोडण्याची धमकी दिली होती. मात्र, साक्षी ऐकत नसल्यामुळे शुक्लाने विनयचा गोळ्या झाडून खून केला आणि पळून गेला. साक्षीने सर्व काही कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि ताफा घटनास्थळावर पोहचला. त्यांनी घटनास्थळ पंचनामा करीत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of vinay punekar due to immoral relationship girlfriend sakshi gover arrested adk 83 mrj