मतदार नोंदणीसाठी वय कमी पडते?; चिंता नको, काय आहे भावी मतदारांसाठी योजना ? |must be at least 18 years of age to be enrolled in the electoral roll new voters scheme in nagpur news | Loksatta

मतदार नोंदणीसाठी वय कमी पडते?; चिंता नको, काय आहे भावी मतदारांसाठी योजना ?

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी १८ वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र १७ वर्ष वयोगटातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नावे भावी मतदार (प्रि-व्होटर) म्हणून नोंदवली जाणार आहे.

मतदार नोंदणीसाठी वय कमी पडते?; चिंता नको, काय आहे भावी मतदारांसाठी योजना ?
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

नागपूर: निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत स्वत:चे नाव नोंदवून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवल्या जात आहे. घरबसल्याही नोंदणी करता यावी म्हणून ॲप तयार केले आहेत. ऐवढ्यावरच त्यांचे प्रयत्न थांबले नाही तर ज्यांनी १७ वर्ष पूर्ण केले त्यांच्यासाठीही भावी मतदार म्हणून नाव नोंदवण्याची योजना सुरू केली आहे. काय आहे ही योजना.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी १८ वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र १७ वर्ष वयोगटातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नावे भावी मतदार (प्रि-व्होटर) म्हणून नोंदवली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राचार्य व मुख्याध्यापकांना आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात यासंदर्भात जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक तसेच शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर, उपजिल्हाधिकारी हेमा बढे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे‍ तसेच निवडणूकविषयक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: घटस्फोट झाला नसताना दुसरे लग्न म्हणजे क्रूरताच; काय आहे न्यायालयाचा निर्णय?

महाविद्यालयातील १७ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे भावी मतदार म्हणून नाव नोंदणी अर्ज भरावे. अर्जाचा नमूना क्रमांक ६ कसा भरावा, व्होटर हेल्पलाईन ॲपमध्ये माहिती कशी भरावी यांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. अशाच प्रकारे प्रात्यक्षिक महाविद्यालयात व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे घ्यावे व विद्यार्थ्यांना अर्ज भरायला लावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले.

हेही वाचा: ठरलं! गुजरातच्या सिंहांचा महाराष्ट्रातील ‘या’ प्राणीसंग्रहालयात प्रवेश

शिक्षक मतदार संघ, मतदार नोंदणी करण्यासाठी पात्रता काय ? याची माहिती देण्यात आली. या मतदारसंघात मतदार होण्यासाठी अर्जदार नागपूर विभागातील रहिवासी असावा. १ नोव्हेंबरपूर्वीच्या ६ वर्षापैकी ३ वर्ष माध्यमिक किंवा त्यावरील शिक्षण संस्थेत शिकक्ष म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. वरील कालावधी एखादा शिक्षक सेवानिवृत्त झाला असेल तरीही ते आपल्या नावाची नोंदणी करु शकतात, असे सांगण्यात आले. बैठकीला शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:10 IST
Next Story
घटस्फोट झाला नसताना दुसरे लग्न म्हणजे क्रूरताच; काय आहे न्यायालयाचा निर्णय?