नागपूर :Solar Explosives Company Explosion Nagpur केंद्र सरकारने आयुध निर्माणी कारखान्यांकडून काम काढून खासगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकाले आहे. त्यामुळे नागपूर शहराच्या आसपास दारुगोळा बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्या सर्वांत मोठी सोलार इंडस्ट्रीज कंपनी आहे. नागपूर-अमरावती मार्गावरील बॉम्ब बनवणाऱ्या या सोलार इंडस्ट्रीज कंपनीत गेल्या नऊ महिन्यात दुसऱ्यादा स्फोट होवून अनेक कामगारांचा जीव गेला आहे.
बाजारगाव परिसरात अनेक बारुद कंपन्या आहेत. यामध्ये वारंवार स्फोट होवून कामगारांचा बळी जात आहे. बुधवारी मध्यरात्री सोलार कंपनीत झालेला स्फोट हा भीषण होता. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून जवळपास १७ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या अगोदर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात याच कंपनी स्फोट होवून १० कामगारांचा मृत्यू झाला होता. तर मागील वर्षीच धामणा परिसरातील चामुंडा कंपनीत स्फोट झाल्याने येथील नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. बारुद कंपनीमध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटाच्या घटना या गंभीर असून राज्य सरकारने अश्या घटना होवू नये यासाठी कडक नियमावली बनवली पाहीजे, असेही मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
ते सोलार कंपनीमध्ये भेट दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर बाजारगाव येथील सोलर कंपनीमध्ये स्फोट झाला होता. घटनेची माहिती मिळताच अनिल देशमुख हे घटनास्थळी रवाना झाले होते. त्यांनी घटनेची संपुर्ण माहिती घेत जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अनिल देशमुख यांनी त्यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठाणच्या रुग्णवाहीकेला बोलावून कोंढाळी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये प्रथम उपचारासाठी आणलेल्या तसेच कंपनीत असलेल्या जखमी कामगारांना नागपूर येथील रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली.
पहाटेपर्यत रुग्णांना नागपूर येथे हलविण्यात येत होते. या कामात वसंतराव देशमुख प्रतिष्ठाणच्या रुग्णवाहीकेचे चालक संजय गावकवाड यांनी देवदुताची भुमीका निभावली. रात्रीची वेळ असल्याने आणि सुरक्षेच्या कारणावरुन प्रशासनाने अनिल देशमुख यांना कंपनीत जाऊ नये अशी विनंती केल्यावर ते परत नागपूरला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता अनिल देशमुख यांनी परत सोलार कंपनी गाठली.
येथील उपस्थीत असलेल्या पोलिस अधिकारी तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन घटना नेमकी कशी घडली याची माहिती जावुन घेतली. तसेच उपस्थीत कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यासोबत सुध्दा चर्चा केली. दरम्यान त्यांनी नागपूरातील दंदे रुग्णालयात जावुन जखमीची विचारपुस केली. तसेच डॉ. पिनाक दंदे यांच्यासोबत संवाद साधून जखमीच्या प्रकृती चौकशी केली. रुग्णालयात उपस्थित असलेल्या जखमी कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांना सुध्दा त्यांनी धिर दिला. मृतकाच्या कुटुंबीयांना कंपनीने भरीव मदत करुन सर्व जखमीवर कंपनीच्या खर्चातून उपचार करण्याच्या सूचना अनिल देशमुख यांनी कंपनी प्रशासनाला केली.