पावसामुळे नागपूर जलमय; मंदिर कोसळले, सहाजण जखमी

उपराजधानीसह संपूर्ण नागपूर जिल्हा संततधारेमुळे जलमय झाला आहे शिवमंदिर कोसळल्याने सहा जण जखमी झाले.

पावसामुळे नागपूर जलमय; मंदिर कोसळले, सहाजण जखमी
पावसामुळे नागपूर जलमय; मंदिर कोसळले

गोरेवाडा, फुटाळा तलाव ‘ओव्हरफ्लो’, शाळांना सुटी जाहीर

नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण नागपूर जिल्हा संततधारेमुळे जलमय झाला आहे शिवमंदिर कोसळल्याने सहा जण जखमी झाले. गोरेवाडा तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला असून प्रकल्पाचे दरवाजे खुले करण्यात आले आहे. फुटाळा तलावंदेखील ‘ओव्हरफ्लो’ झाला असून फुटाळा चौपाटीवर पाणी आले आहे.

भालदारपुरा परिसरातील शिवमंदिर पावसामुळे कोसळले. ,या घटनेत सहा जण जखमी झाले. त्यात एका चिमुरडीचा समावेश आहे. जखमीना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आला आहे.शहरातील अनेक सखल भागात तसेच अनेक वस्त्यांमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. लगतचा कुही तालुका जलमय झाला असून शेतीत पाणी साचले आहे. मौदा तालुक्यातील झोपडपट्टी भागात पाणी शिरले आहे. पावसामुळे विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नारायणा, स्कुल ऑफ स्कॉलर, डीपीएस, सोमलवार आदी शाळांना सुटी देण्यात आली आहे. भालदारपुऱ्यातील घटनेत सहा जण जखमी त्यात एका चिमुरडीचा समावेश आहे. जखमीना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur flooded due to rain temple collapsed six injured ysh

Next Story
नागपूर : स्कूलबस, स्कूलव्हॅनची ‘योग्य’ तपासणीच नाही, अपघाताची टांगती तलवार कायम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी