nagpur teacher constituency candidate Sudhakar Adbale and Nago Ganar meet at the same polling station in nagpur Vmb 67 ssb 93 | Loksatta

नागपूर : प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मतदान केंद्रावर, घेतली गळाभेट; म्हणाले…

जेव्हा निवडणूक शिक्षकांची असते तेव्हा उमेदवार असले तरी त्यांच्यातला शिक्षक जागा असतो आणि असेच एक चित्र आज शहरातील मोहता सायन्स कॉलेजच्या मतदान केंद्रावर पाहायला मिळाले.

Sudhakar Adbale Nago Ganar meet
प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकाच मतदान केंद्रावर घेतली गळाभेट (image – लोकसत्ता टीम)

नागपूर : निवडणुकीत रिंगणात असलेले राजकीय पक्षाचे उमेदवार एकमेकांचा चेहराही पाहत नाहीत. परस्परांना भेटतही नाहीत. मात्र जेव्हा निवडणूक शिक्षकांची असते तेव्हा उमेदवार असले तरी त्यांच्यातला शिक्षक जागा असतो आणि असेच एक चित्र आज शहरातील मोहता सायन्स कॉलेजच्या मतदान केंद्रावर पाहायला मिळाले.

भाजपने पाठिंबा दिलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागो गाणार, तसेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले जेव्हा मतदान केंद्रावर समोरासमोर आले तेव्हा दोघांनी एकमेकांची भेटच घेतली नाही तर एकमेकांना शुभेच्छा देत गळाभेट घेतली.

हेही वाचा – नागपूर: देशात लोकशाही आहे असे म्हणणे बाळबोधपणा; सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांचे मत

हेही वाचा – संघाची सर्वसमावेशक भूमिका वैदिक हिंदू राष्ट्र निर्माणाचा ‘अजेंडा’; विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची टीका

शिक्षणात राजकारण नकोच उलट राजकारणात शिक्षण आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी नागो गाणार यांनी दिली. मी बारा वर्ष या मतदारसंघात भरपूर कामे केली आहेत म्हणून विजय माझाच होईल, असे ते म्हणाले. तर सुधाकर अडबाले यांनी माझा विजय होईल, असे मत त्याचवेळी व्यक्त केले. आम्ही आजवर अनेक परीक्षा घेतल्या असून निवडणुकीच्या या जन परीक्षेतही मीच उत्तीर्ण होईल, असा अडबाले यांचा दावा आहे. तर नागो गाणार यांनी त्यावर लगेच पहिला मेरिट मीच येईल असा प्रतिस्पर्धी दावा केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 09:54 IST
Next Story
“बागेश्वर बाबा जिथे दिसेल, तिथे ठोकून काढा”; तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “शिंदे सरकार…”