scorecardresearch

नागपूर: देशात लोकशाही आहे असे म्हणणे बाळबोधपणा; सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांचे मत

ईडी, सीबीआय दाखवून विरोधकांना धमकावले जात आहे. लोकांचे प्रश्न विधिमंडळात सोडवले जात नाही.

Vishwambhar Chaudhary
डॉ. विश्वंभर चौधरी

ईडी, सीबीआय दाखवून विरोधकांना धमकावले जात आहे. लोकांचे प्रश्न विधिमंडळात सोडवले जात नाही. यंत्रणांचा वापर निवडक लोकांसाठी केला जात आहे. अशा स्थितीत या देशात लोकशाही आहे असे म्हणणे बाळबोधपणा ठरेल, असे ठाम मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मांडले.

हेही वाचा >>>नागपूर : पैसे न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने चिरला वृद्ध आईचा गळा

लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम विनोबा विचार केंद्र, सर्वोदय आश्रम येथे रविवारी पार पडला. याप्रसंगी ‘आजच्या राजकारणात महात्मा गांधी व लोकशाहीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उरलेत का?’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान झाले. यावेळी माजी खासदार विजय दर्डा, ॲड. असीम सरोदे व्यासपीठावर होते.

हेही वाचा >>>‘एमपीएससी’ भरतीमध्ये जाचक अटींचा विद्यार्थ्यांना फटका! विभागनिहाय गुणवत्ता यादीमुळे मुख्य परीक्षेला मुकण्याची शक्यता

ते म्हणाले, या देशात लोकशाही आहे काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. सुबुद्ध नागरिकांना लोकशाही आहे असे वाटत नाही. किरीट सोमय्या ईडी कोणावर आणि केव्हा कारवाई करेल हे सांगतो. सभागृहात सत्ताधारी विरोधकांना धमक्या देतात. पण, पुरावे असतील तरी कारवाई करीत नाही. याचा अर्थ त्यांचे साटेलोटे आहे. उद्योगपती अदानी व्यवहारातील गडबड परदेशी कंपनी अहवाल बाहेर काढते आणि तो सर्वोच्च न्यायालयाने क्लिनचीट दिल्याचे सांगतो. अशाप्रकारे तो सर्व यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात आणणार आहे आणि ५६ इंची छाती सांगणारे काहीच करू शकणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.संचालन रवींद्र भुसारी यांनी केले तर संदेश सिंगलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक विचारवंत, प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

हेही वाचा >>>अपघातप्रवण स्थळे दुरुस्तीसाठी राज्याला ११२ कोटी रुपये; सुरक्षित प्रवासासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाचा प्रयत्न

देशात गुलाम बनवण्याचे कारखाने – द्वादशीवार
भारत हा लोकशाही मनात जपणारा देश आहे. लोकांच्या मनात लोकशाही किती ठासून भरलेली आहे हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत दिसून आले. लोक उत्स्फूर्तपणे यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले. देशात गांधीवादी, मार्क्सवादी, हिंदूवादी आणि आंबेडकरवादी आहेत. यापैकी तीन तर गांधी विरोधी होते. त्यामुळे गांधी, नेहरू सांगण्याची जबाबदारी सर्वोदयी यांची होती. ती त्यांनी योग्यरित्या पार पडली नाही. त्यामुळे गांधी-नेहरू यांची बदनामी करण्याचे षडयंत्र सफल झाले आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभेदाविषयी खूप सांगण्यात येते. पण, त्यांची आत्मीयता कोणाकडूनही सांगितली जात नाही. ते एका पाश्चिमात्य लेखकाला सांगावे लागले. देशात आणीबाणी लावली आणि त्याचे परिणाम इंदिरा गांधी यांना भोगावे लागले. ती तर कायदेशीर आणीबाणी होती, आज अघोषित आणीबाणी आहे. आज एकाधिकारशाही आली आहे. देशात गुलाम बनवण्याचे कारखाने जोमात चालले आहेत, असे विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 09:31 IST

संबंधित बातम्या