नागपूर : पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटक ठार झाल्यानंतर भारताने प्रतिउत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे स्थळ उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने आगळिक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही भारतीय लष्काराने चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय रेल्वेने ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश देशभर पसरवण्यासाठी एक देशव्यापी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत रेल्वे प्रशासाने म्हटले आहे की, आपल्या सशस्त्र दलांवर आम्हाला गर्व आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पडले. संपूर्ण देश त्यांच्या वीरतेचा उत्सव साजरा करत आहे. या श्रद्धांजलीसाठी, भारतीय रेल्वेने तिकिटांवर हा संदेश दर्शवण्याचा आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ दर्शवणाऱ्या तिरंगा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूरचे यश हे एक अत्यंत राष्ट्रीय गर्वाचे मुद्दा आहे. आम्हाला विश्वास आहे की ही गोष्ट भारताच्या प्रत्येक कोपरापर्यंत पोहोचली पाहिजे, आणि यासाठी, आम्ही एक मोहीम राबवित आहोत. मात्र, ऑपरेशन सिंदूरचा लोगो आणि एक संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे छायाचित्र रेल्वे तिकीटावर प्रकाशित करून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहिरात केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
भारतीय रेल्वे तिकिटांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेल्या मुद्द्यावर राजकीय वादळ उठले आहे. हे मोदी सरकार कशाप्रकारे जाहिरातांमध्ये अडकले आहे याचे एक उदाहरण आहे. ते ‘ऑपरेशन सिंधूर’ रेल्वे तिकिटांवर जाहिरात म्हणून वापरत आहेत. ते सैन्याच्या शौर्यालाही उत्पादनासारखे विकत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
१७ मे रोजी संम्पर्क क्रांती एक्सप्रेसच्या थर्ड एसी कोचमध्ये भोपाल-झांसीचे तिकीट बुक केले आहे, त्यावर पीएम मोदीचा एक चित्र आहे. ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे शीर्षक वापरले आहे. भारताने पाकिस्तानाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे अंमलात आणल्यानंतर, भाजप लष्कराच्या यशांचा वापर निवडणुकीसाठी फायदा घेण्यासाठी करत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
भारतात सशस्त्र दलांचे राजकारण कधीही करण्यात आले नव्हते. पण भाजपा नेत्यांनी पहिल्यांदा ते केले आहे. रेल्वे तिकीट मोदीच्या फोटो आणि विधानासह प्रचार साहित्यात रूपांतरित झाले, असा आरोप होत आहे. हे आगामी बिहार निवडणुकांमध्ये राजकीय फायद्यासाठी सैन्य वापरणे स्पष्ट आहे. अशा प्रथांना त्वरित बंद करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युद्ध आणि शहिदीला संधी म्हणून पाहतात, अशी टीकाही केली जात आहे.