लोकसत्ता टीम

बुलढाणा: जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातील डुकराना ‘अफ्रिकन स्वाईन फिव्हर’चा संसर्ग झाल्याने त्यांना ठार मारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

गेल्या महिन्याभरात हजारो डुकरांचा अचानक मृत्यू झाला आहे. पशु संवर्धन विभागाच्या मार्गदर्शनात बुलडाणा नगरपालिकेने मेलेल्या डुकरांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. या डुकरांचा मृत्यू ऑफ्रिकन स्वाईन फिव्हर या रोगामुळे झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व डुकरांचा नायनाट करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले आहेत.

आणखी वाचा-दीक्षाभूमीला २०० कोटींचा निधी; मोठा स्टेज, भव्य पार्किंग, दोन वर्षांत रूपडे पालटणार…

नगरपालिकेने डुकरांचा नायनाट करण्यासाठी दहा कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. डुकराना पकडून त्यांना ठार मारण्यासाठी हनवतखेड येथील डम्पिंग ग्राउंड येथे नेण्यात येत आहे.त्यांना विशिष्ट इंजेक्शन देऊन ठार मारल्यावर विल्हेवाट लावण्यात येत आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी ही माहिती दिली आहे.