अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला की पाडला, असा संशय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला येथे शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. शिवाजी महाराज यांचा हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोसळला. त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील राजकारण देखील पेटले आहे. या प्रकरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करून संशय व्यक्त केला. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात बरीच विधाने आली आहेत; परंतु धातूचा पुतळा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे पुतळे गावा-गावांमध्ये बसवण्यात आले आहेत. ते फक्त चबुतऱ्यावर बसवण्यात आले आहेत. ते पुतळे कधी पडल्याचे आजपर्यंत समोर आलेले नाही. पुतळ्यांचे विद्रुपीकरण किंवा विटंबना करण्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. या सगळ्यावरून मला संशय येत आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला की पाडला?.

हेही वाचा >>> Sexually Assaulted Minor Girl : अल्पवयीन मुलीला खोलीवर बोलावले आणि दोन शिक्षकांनी….

महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकते. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी तर ही घटना घडली नाही ना? अशी शंका निर्माण होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. याच्या मागे कोण आहेत, हे पोलिसांनी शोधावे. कोणी पाडला त्याला पहिल्यांदा पकडावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना आदराचे स्थान असून ते मावळ्यांचे राज्य प्रस्थापित करणारे व्यक्तिमत्त्व आहेत, असे देखील ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा >>> राष्ट्रवादीचे मंत्री आत्राम म्हणतात “ही माझी शेवटची निवडणूक, यानंतर …”

ओबीसी मतपेढी एकत्रित आणण्याचे प्रयत्न 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विविध ओबीसी संघटनांसोबत बैठक झाल्या आहेत. जिल्हास्तरावर निवडणूक समिती व आघाडी स्थापन केली आहे. ओबीसीच्या सर्व सामाजिक संघटनांना एकत्रित आणण्याचे वंचित आघाडीचे प्रयत्न असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar demand investigation into shivaji maharaj statue collapse and action against the culprits ppd 88 zws